अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख सध्या कोरोनामुळे आजारी असून मुंबई येथे उपचार घेत आहे.
ते आजारातून लवकर बरे व्हावे व कोरोनाचे जगभरातील संकट दूर व्हावे, यासाठी नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील श्रीघोडेश्वरी देवी मंदिरात कार्यकर्त्यांनी अभिषेक करून आरती केली. याप्रसंगी वसंतराव सोनवणे म्हणाले, प्रशांत गडाख यांनी अनेकांना मदत केली.
कित्येक संसार उभे केले. या आशीर्वाद व प्रेमाने ते लवकर बरे होतील. पुन्हा नव्या जोमाने काम करतील. प्रशांत गडाख रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे नेवासे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
सर्व जाती धर्मातील मित्रपरिवार ते कोरोनातून बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहे. घोडेगाव येथे वसंतराव सोनवणे, दीपक जाधव, अविनाश येळवंडे, मनोज नहार, अॅड. पारस नहार, सुनील बनबेरू, दादा दरंदले, अविनाश कराळे, विष्णू चौधरी, दादा पाटील सोनवणे,
नवनाथ वैरागर, रहिमुद्दिन इनामदार, जाकीर शेख, भाऊसाहेब बोरुडे आदी उपस्थित होते. घोडेगाव येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अविनाश येळवंडे
यांनी प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वस्थ्यासाठी घोडेश्वरी मातेच्या चरणी प्रशांत गडाख यांच्या वजनाइतके पेढे अर्पण करण्याचा नवस केला. घोडेगाव येथील श्रीघोडेश्वरी मातेस प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आरती व अभिषेक करण्यात आला.