कोरोनाकाळात राबविलेल्या मोफत आरोग्य शिबीराबद्दल नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या

मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा उद्योजक विश्‍वनाथ पोंदे यांनी गौरव केला.

यावेळी प्रकाश गुगळे, जयेश पाटील, बाबासाहेब धीवर आदी उपस्थित होते. विश्‍वनाथ पोंदे म्हणाले की, दीन, दुबळ्यांना संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशनने आधार देण्याचे काम केले.

अनेक दृष्टीहिनांना नवदृष्टी देण्याचे काम शिबीराच्या माध्यमातून करुन वंचितांच्या जीवन प्रकाशमय केले.

तर गरजू रुग्णांना आरोग्य शिबीर निशुल्क उपलब्ध करुन दिले. 28 वर्षापासून फिनिक्सच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकातील नागरिकांसाठी अविरतपणे मोफत शिबीर घेण्याचे कार्य त्यांचे सातत्याने सुरु असून,

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश गुगळे यांनी कोरोना काळातही नागरिकांची गरज ओळखून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरुडे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले.

नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी देण्यासाठी त्यांचा पुढाकार राहिला असल्याचे स्पष्ट केले. जालिंदर बोरुडे यांनी सत्काराला उत्तर देताना आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या परवडत नाही.

फिनिक्स फाऊंडेशन राबवित असलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजूंची सोय होत असल्याचे सांगितले. ही सेवा अविरतपणे सुरु राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24