५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा : श्रीरामपूरच्या राजकीय क्षेत्रात मोगलाई माजली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचे व श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते.

या आंदोलनांवरुन नगराध्यक्ष अनुराधा आदिकांनी आपल्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हा दावा म्हणजे येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न असून इतर विरोधी राजकीय नेत्यांना हा धमकीवजा इशारा असल्याचे भाजपचे नेते व श्रीछत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही नगरपालीकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचे व श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते. यामध्ये आपली बदनामी होईल, असे वक्तव्य व पत्रक चित्ते यांनी वाटल्यावरून नगराध्यक्ष अनुराधा आदिकांनी त्यांचेवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत चित्ते बोलत होते. यावेळी बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, डॉ. दिलीप शिरसाठ, अरुण पाटील, किरण लुणिया, मनोज हिवराळे, संजय पांडे, सुदर्शन शितोळे, अॅड. परदेशी, अभिजित कुलकर्णी, प्रवीण फरगडे, बाबा शिंदे, प्रवीण दैठणकर,

सोमनाथ पतंगे, संजय पारख, सोमनाथ कदम, गणेश भिसे, संदीप वाघमारे, विकी देशमुख आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, श्रीरामपूरच्या राजकीय क्षेत्रात मोगलाई माजली असून असल्या हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच झाला पाहिजे यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आपली तयारी आहे. पण श्रीशिवाजी चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे शिवप्रेमींचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच झाला पाहिजे. या मागणीसाठी शिवप्रेमींनी गेल्या ३० वर्षांत अनेक आंदोलने केली. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी व आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच बसवू अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका जाहीर न केल्याने हे सत्ताधारी श्रीशिवाजी चौक सोडून दुसरीकडेच, इतर ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवणार आहेत.

या शंकेने शिवप्रेमींच्या मनात गेली. अनेक वर्ष घर केलेले आहे. त्यामुळेच श्रीशिवाजी चौकातील पुतळ्याच्या मागणीला चळवळीचे स्वरूप आले. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचे परिणाम भोगावे लागतील. नगराध्यक्षांचे छत्रपतींच्या श्रीशिवाजी चौकातील पुतळ्याच्या विषयात खायचे दात वेगळे असून दाखवायचे दात वेगळे आहे.

नगराध्यक्षांच्या या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात आंदोलन केले, तर ते त्यांना सहन होत नाही. छत्रपतींच्या पुतळ्याच्या विषयातच नाही; तर नगरपालीकेच्या इतर कुठल्याही विषयात (नागरी समस्या,

भ्रष्टाचार आदींसारख्या दुसऱ्याने कुणीही त्यांच्यावर व त्यांच्या कारभारावर आरोपच करू नये, संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातल्या राजकीय पर्यावरणात भितीचा आणि धमकीचा संदेश जावा म्हणून आदिकांनी माझ्यावर ५ कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. यावरून आता राजकारण तापले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24