अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतीनिधींवर आरोप करत ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
नुकतेच देवरे यांच्यावर होत असल्याच्या अन्याय आणि पिळवणुकीची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावर गठीत केलेल्या समितीने सोमवारी 18 व्यक्तींना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलेले होते. मात्र पहिल्या दिवशी यापैकी 5 जणांनी दांडी मारली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तहसीलदार देवरे यांची आत्महत्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून यात उपजिल्हाधिकार उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली वाघ या सदस्य आहेत. या समितीने सोमवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी 18 जणांना बोलविले होते. त्यातील 13 अधिकारी, कर्मचारी आणि अन्य व्यक्ती चौकशीला येवून गेले.
मात्र यापैकी 5 जण उपस्थित नव्हते. यामध्ये असून यात तक्रारदार स्वत: ज्योती देवरे, त्यांचा वाहन चालक बाबा औटी, पारनेर रुग्णालयाच्या डॉ. मनिषा उंद्रे आणि डॉ. श्रध्दा अडसूळ आणि पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांचा समावेश आहे.याबाबतची माहिती महसूल विभागाच्या सुत्रांनी दिली.