AC Tips : उन्हाळयाच्या दिवसात पंखा, कुलर तसेच एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेकजण एसी खरेदी करतात. बाजारात अनेक ब्रँडेड एसी उपलब्ध आहेत. अशातच या एसींवर मोठ्या प्रमाणात सवलतही देण्यात येत आहे.
परंतु अनेकदा ब्रँडेड एसी असून खोली थंड होत नाही. एसीच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकची गरज आपल्याला पडत असते. मात्र तुम्ही आता मेकॅनिकशिवाय घरच्या घरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय एसी दुरुस्त करू शकता. कसे ते जाणून घ्या.
1.सर्वात अगोदर, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे की चांगल्या कूलिंगसाठी तुमच्याकडे असणाऱ्या एसीला ‘कूल मोड’ वर सेट करा.
2. तसेच खोली थंड होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या AC चा फिल्टर साफ करावा लागणार आहे. कारण फिल्टरमुळे AC चा हवा प्रवाह चांगला राहून जबरदस्त थंड हवा देतो. त्यामुळे किमान एका आठवड्यातून स्वतः फिल्टर स्वच्छ करा.
3. अनेकजण त्यांच्या खोलीनुसार छोटा किंवा मोठा पंखा लावत असतात, मात्र याचा परिणाम एसीच्या कूलिंगवर दिसून येतो. त्यासाठी हे लक्षात ठेवा की 100 चौरस फूट खोलीसाठी 1-टन एसी पुरेसा असून 150 चौरस फूट खोलीसाठी 1.5 टन एसी तसेच 200 चौरस फूट खोलीसाठी 2 टन एसी पुरेसा आहे.
4. तसेच एसी सुरु करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुमच्या खोलीच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. ज्यामुळे तुमची खोली थंडी राहील. खिडक्या आणि दरवाजे सतत उघडले तर त्याचा एसीच्या कूलिंगवर परिणाम दिसून येतो.
5. समजा तुमच्या खोलीत थेट सूर्यप्रकाश येत असेल तर तुमची खोली थंड राहत नाही. त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी, तुमच्या खोलीच्या खिडक्यांवर पडदे लावा. ज्यामुळे सूर्याची किरणे तुमच्या खोलीत थेट प्रवेश करणार नाहीत.