अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- सरकारी आणि खासगी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे आणि पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांच्या सोबत मुंबईत झालेल्या बैठकीनंतर तात्पूर्ते स्थगित करण्यात आले असल्याची
माहिती पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष (नगर) ज्ञानेश्वर गांगर्डे यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुंबईत नुकतेच झालेल्या बैठकीत पशूसंवर्धन मंत्री केदार यांनी सरकारी आणि खासगी पशुचिकित्सक यांच्या मागण्या मान्य केल्या असून याबाबत येत्या 15 दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
तसेच तातडीने येत्या शनिवारपर्यंत पद्विकाधारक जनावरांच्या डॉक्टरांच्याबाबत 2009 चे नोटीफिकेशन रद्द करून 1997 च्या पशूसंवर्धन विभागाच्या नोटीफीकेशन नूसार पद्विकाधारक जनावरांच्या डॉक्टरांना स्वतंत्रपणे पशूधनाची सेवा देण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
यामुळे या डॉक्टरांना आता कृत्रिम रेतना सोबत जनावरांवर थेट उपचार करणे, स्वत: जवळ जनावरांची औषधे बाळगता येणार आहेत. यासह अन्य मागण्यावर 15 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन पशूसंवर्धन मंत्री केदार यांनी दिले.