अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारातील तोडमल वस्तीजवळ भरधाव वेगातील सियाजकारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
अपघातात पांडुरंग भानुदास कराळे हे मृत्यूमुखी पावले. कराळे हे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील मुळचे रहिवासी होते. बाबासाहेब भानुदास कराळे
यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मारूती सियाज कारचे (क्र. एम. एच. १४ जी. ए. ७७०५) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सियाज कारने मोटारसायकलला (क्र. एच. एच. १६ ए. यु. १९७४) जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. पुढील तपास पो. ना. गांगर्डे हे करत आहेत.