भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात! हॉटेल उद्योजकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात होऊन त्यात खडकाफाटा रोडवरील एका २२ वर्षीय युवा हॉटेल उद्योजकाचा मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले आहेत.

अमोल लोखंडे असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. उद्योजक अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे,मनोज शिंदे, नितीन निपुंगे यांच्या समवेत स्वीप्ट कारने भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा ते ओतूर रस्त्यावरील आणे घाटावर पडलेल्या दरडीला ही कार धडकली व पुढे जाऊन पलटी झाली.

यात अमोल लोखंडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील अन्य जखमी झाले, जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24