अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव शहरातील मोठ्या पुलावर दुचाकी आणि ट्रेलरचा अपघात होऊन या अपघातात नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रियंका सचिन सोळुंके( वय 24 रा मालुंदे खुर्द ता.श्रीरामपूर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
रक्षाबंधन सणासाठी माहेर आलेली प्रियांका आपल्या भावासोबत सासरी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवविवाहित तरुणी व अन्य जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वैद्यकीय सूत्रांनी नवविवाहि तरुणीला मृत म्हणून घोषित केले.
दरम्यान याबाबत शहर पोलीसंनी ट्रेलर पोलिस स्टेशनला आणले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.