अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ गवजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली.
माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना देवळाली प्रवरा- श्रीरामपूर रोड येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तातडीने नगरला मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र चव्हाण यांना जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वैद्यकीय उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
परिसरात अण्णा म्हणून परिचीत असलेले जगन्नाथ चव्हाण यांच्या निधनाने सर्वत्र देवळाली प्रवरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.