ताज्या बातम्या

EPFO Account Holder Good News : ​​खातेधारकांना ‘या’ दिवशी मिळणार 81,000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स..

Published by
Ahmednagarlive24 Office

EPFO Account Holder Good News : अनेक दिवसांपासून EPFO ​​खातेधारक त्यांच्या व्याजाच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. याच खातेधारकांसाठी एक आनंदची बातमी आहे.

कारण लवकरच या खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम म्हणजे 81,000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम कशी मिळवायची आणि ही रक्कम कशाप्रकारे चेक करायची ते जाणून घ्या.

रक्कम कशी मिळवायची?

या वर्षीचा व्याजदर हा 8.1 टक्के इतका आहे, हा दर 40 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. खातेधारकांच्या खात्यात 10 लाख रुपये असतील त्यांना 81,000 रुपये इतकी व्याजाची रक्कम मिळणार आहे.

7 लाख रुपये ठेवणाऱ्यांना 56,700 रुपये व्याज मिळणार असून पीएफ खात्यात 5 लाख ठेवणाऱ्यांना 40,500 रुपये तर 1 लाख रुपयांसाठी 8,100 रुपये व्याज असणार आहे.

अशी तपासा व्याजाची रक्कम?

मिस कॉलद्वारे

खातेधारक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकतात.त्यानंतर ही शिल्लक एसएमएसद्वारे समजेल. त्यासाठी त्यांच्याकडे UAN, PAN आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे.

एसएमएसद्वारे

  • एसएमएसद्वारे खातेदारांकडे त्यांचा UAN नोंदणी करणे आणि त्यांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरणे गरजेचा आहे.
  • त्यानंतर EPFOHO ला 7738299899 वर एसएमएस करा
  • इंग्रजी व्यतिरिक्त, हिंदी, मराठी, पंजाबी, कन्नड, तामिळ, बंगाली, तेलगू, मल्याळम भाषेमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

अॅपद्वारे

  • उमंग अॅप डाउनलोड करा आणि उघडा.
  • त्यानंतर EPFO टॅबवर क्लिक करा.
  • कर्मचारी-केंद्रित सेवांवर जा.
  • ‘पासबुक पहा’ वर क्लिक करा.
  • UAN आणि पासवर्ड (OTP) तपशीलांसह लॉग इन करा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
  • आता तुमचा पीएफ शिल्लक चेक करा.

ऑनलाइन चेक करा रक्कम

  • तुम्ही ऑनलाइन रक्कम चेक करू शकता, त्यासाठी EPFO च्या http://epfindia.gov.in
    या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर ई-पासबुकसाठी लिंकवर जा.
  • लिंकवर गेल्यानंतर ई-पासबुक लॉगिन पेजवर तुमचा UAN आणि पासवर्ड माहिती वापरून लॉगिन करा, सबमिट वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर तुमचा सदस्य आयडी निवडा.
  • ईपीएफओ ई-पासबुकवर तुमची ईपीएफ शिल्लक तपासा.
Ahmednagarlive24 Office