स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप ; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-+करोनाच्या या संकटात राज्य सरकार आपले अपयश झाकण्याकरिता सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे.

त्यांनी कधी तरी आपले आत्मचिंतन करून अश्या काळात आपण काय केले पाहिजे असा विचार करावा. असा टोला माज़ीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लागवाल आहे.

कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या संजीवनी कोव्हीड केअर सेंटरला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी तिनच्या दरम्यान भेट देऊन ऑक्सिजन बेड विभागाचे उदघाटन केले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, कोल्हे परिवाराने संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून करोना बाधित रुग्णासाठी आत्मा मालिक संस्थेच्या सहाय्याने

गरजू व गरीब रुग्णांच्या सेवेसाठी संजीवनी कोव्हीड सेंटर हे सर्व सुविधांनी युक्त उत्तम व्यवस्था उभी केली ही सुविधा बधितांसाठी लाभदायक असून बाधितांना मोठी मदत होत होईल.

दरम्यान, विवेक कोल्हे यांनी संजीवनी कोविड सेंटरमध्ये करोना बाधित रूग्णांसाठी सुरू असलेल्या सुविधांची माहिती देऊन फडणवीस यांच्याकडे विविध समस्यांची मांडणी केली.

यावेळी फडणवीस यांनी संजीवनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन बेड विभागाची पहाणी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर व इतर सेवकांशी संवाद साधला.

अहमदनगर लाईव्ह 24