अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील चास शिवारातील अश्विनी पेट्रोलपंपवर काम करणारा कर्मचारी मात्र चोरी करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले.
सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे त्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि.१४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील शिवारातील अश्विनी पेट्रोल पंपावर काम करणारा सोमनाथ जगन्नाथ जाधव याने दि.२१ मार्च २०१९ रोजी जमा झालेली २९ हजार ६९३ रुपये रक्कम चोरून नेली होती.
या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हा सध्या निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे राहात असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली.
त्यानुसार सानप यांनी पोलिस पथकाला सूचना देऊन औरंगाबाद जिल्ह्यात जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याला आरोपीस खाक्या दाखवताच जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली.
तसेच चोरून नेलेली रक्कम काढून दिली. पोलिसांनी ती रक्कम जप्त करून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.१४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.