अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील एका २८ वर्षीय आरोपीने तालुक्यातील गारवाडीतील आदिवासी समाजाच्या २७ वर्षीय अविवाहित तरुणीचे मोबाइलमधून शुट केलेल्या काही व्हिडोओ क्लिप व सुमारे दोन रिम कागद भरतील एवढ्या संख्येत तयार केलेले अश्लील फोटो गारवाडी गावातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व मंदिर परिसरात टाकून तरुणीची बदनामी करण्यात आल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला.
या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पीडितेचे वडील शासकीय खात्यात अभियंता म्हणून नोकरीत आहेत.
हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी पीडितेसह अकोले पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
अकोले पोलिसांकडून यातील आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर (वय २८, रा. कुंभेफळ) याच्यावर भादंवी कलम ३५४ ( क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ७६ व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस गजाआड केले.
आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर व पीडिता संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी विद्यालयात एकत्रित शिक्षण घेत होते. तेव्हापासून त्यांची ओळख आहे. दरम्यान हा तरुण व पीडित तरुणीचे प्रेमसंबंध जुळले.
मालदाड येथील शिक्षण घेतल्यानंतर आरोपी नारायणगाव, तालुका जुन्नर येथील एका कृषीविषयक खासगी कंपनीत नोकरीस लागला.
आरोपी व पीडिता यांच्यात काही कारणावरून बिनसले. आरोपीने चिडून पीडितेच्या अश्लील व विवस्त्र अवस्थेतील काही व्हिडोओ क्लीप रेकॉर्डिंग पीडितेच्या ओळखीच्याच मोबाइल नंबरवर टाकल्या. तसेच व हे अश्लील फोटोज गारवाडी गावात टाकून तरुणीची बदनामी केली.