अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कर्जत शहरातील शिवाजी मोहन दंडे यांच्या घरी चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली होती.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी ही नवनाथ ऊर्फ अंड्या देविदास भोसले (रा. येडेवस्ती, खोरवडी, ता. दौंड) याने केली आहे.
त्यानुसार आरोपीस कोंबिंग ऑपरेशन करुन दौंड पोलीसांच्या मदतीने त्याच्या राहत्या घरून कर्जत पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेतले. हा आरोपी ताब्यात घेत असताना त्याने धारदार चाकु घेऊन पळ काढला.
पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चाकुचा वार करण्याचा प्रयत्न करून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. आरोपीच्या घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता घरात घरफोडी करण्याचे कटावणी तसेच चार धारदार चाकु आढळून आले.
कर्जत येथील घरफोडीमध्ये चोरी करुन नेलेला घागरा चोळी, साडया व रोख रक्कम ५००० तसेच होंडा कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल मिळुन आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस पथक करत आहे.