अवघ्या चार तासात ‘त्या’ कंटेनरसह आरोपी जेरबंद!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कार घेवून जाणाऱ्या कंटेनरचालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व कंटेनर (एचआर ३८ डब्लू ८१२०) असा एकूण ९० लाख २ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल घेवून पळून जाणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, गोव्यावरून दिल्लीकडे मारूती सुझुकी कंपनीच्या कार घेवून जात असलेला कंटेनर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या जवळ कंटेनर चालक चहा पिण्यासाठी थांबला असता. यावेळी बुलेटवरून आलेल्या एकाने त्यास कटरचा धाक दाखवून व इतर ४ साथिदार बोलावूत या सर्वांच्या मदतीने त्यास मारहाण करून कारसह कंटेनेर पळवून नेला होता.

याबाबत कंटेनर चालक हिदायत हनिफ खान (रा.छरोरा, हरियाणा) पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे हिवरगाव पावसा परिसरात शोध घेतला असता. तो याच भागात आढळून आला.याप्रकरणी एकजण ताब्यात घेतला तर इतर चारजण पसार झाले आहेत. अखलाख असीम उर्फ अखलाक असीफ शेख राख़लीलपूरा, ता.जुन्नर हल्ली रा.कुरण याला ताब्यात घेतले आहे.

याच्यावर यापूर्वी जुन्नर तालुक्यात गुन्हा दाखल आहे. पेलिसांनी अवघ्या ४ तासांतच मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपालीकाळे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे पो.नि.पांडुरंग पवार, स.फौ ईस्माईल शेख,पो.ना.बाबा खेडकर, पो.ना .राजेंद्र घोलप,

पो.ना यमना जाधव, चालक पो.ना ओंकार शेंगाळ, पो.ना शिवाजी डमाळे, पो.ना दत्तात्रय मेंगाळ, पोशि अशोक गायकवाड, होमगार्ड नित्यानंद बापु गिरीगोसावी, अमोल दत्तु बुरकुल यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24