अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
खंडणीच्या गुन्ह्यात कोर्टाने आज मंगळवारी बाळ बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यातून कोर्टाच्या निगराणीखाली पारनेरच्या जेलमध्ये गेला आहे.
रेखा जरे हत्याकांडात पत्रकार असलेला बाळ ज. बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली.
तीन महिने गायब असलेल्या बोठेला नगर पोलिसांनी हैदराबादेतून अटक केली. खून प्रकरणात 13 दिवस पोलीस कोठडीत राहिलेल्या बोठेला कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले.
त्या गुन्ह्यातही त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. ही कोठडी संपताच त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले.
दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले.
आणखी तपासासाठी त्याला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी पीआय सुनिल गायकवाड यांनी केली.
तर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून फिर्यादी महिलेने त्यावर पडदा पाडला असून त्यासदंर्भातील प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावली.