हनीट्रॅप प्रकरणामध्ये आरोपींना ‘इतक्या’ दिवसांची कोठडी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणांमध्ये पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यांत वर्ग करण्यात आले आहे. पहिल्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

त्यांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनिट्रॅप प्रकरणामध्ये संबंधित महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांना अटक केली होती. पहिल्या गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसऱ्या दाखल असलेल्या नगर तालुक्यातील तीन कोटींच्या खंडणीच्या एका प्रकरणात या दोघांना वर्ग केले होते.

सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले केले. पहिल्या घटनेमध्ये एक कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वरील दोन आरोपींना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती.

त्याचा तपास सुरू असतानाच नगर तालुक्यामध्ये दुसरा गुन्हा या आरोपींच्या विरोधामध्ये 3 कोटी रुपयांचा दाखल झालेला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती.

या घटनेमध्ये संबंधित महिला व अमोल मोरे हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांचा तपास पोलिसांना करायचा आहे तसेच त्याचे अजून कोण कोण साथीदार आहेत याचा सुद्धा तपास दुसऱ्या गुन्ह्यात करायचा आहे तसेच या दोघांचे संभाषण तसेच त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे ते पुढील तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24