शिर्डीतील बांधकाम मजुराच्या खून प्रकरणातील आरोपींना मालेगावातून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   शिर्डी येथे बांधकाम मजूराचा खून करून उर्वरित फरार असणा-या तीन आरोपींना मालेगाव येथून विविध ठिकाणाहून अटक करण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

यामध्ये साहील गुलशन पठाण (वय १८, रा. पाथर्डी गाव, राजवाड नाशिक), वारसी गॅसउद्दीन रजा शेख (वय १८, रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक), हासीम हारुन खान (वय २०, रा. बोरी कॉलनी, नालासोपारा, जि. ठाणे) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

मालेगाव येथे जावून तांत्रिक तपासाचे आधारे आरोपींचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दरम्यान या खून प्रकरणी यापूर्वी आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय १९, रा. पाथर्डीगाव, सुखदेवनगर, नाशिक), अविनाश प्रल्हाद सावंत ( वय १९, रा. पाथर्डीगाव, नाशिक), अमोल सालोमन लोढे (वय ३२, रा. कालिकानगर, शिर्डी),

अरविंद महादेव सोनवणे ( वय १९, रा. श्रीरामनगर, शिर्डी) यांना पकडण्यात येऊन शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. नेमके प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर २९ जून २०२१ रोजी सायंकाळी मामाचा मुलगा राजेन्द्र आंतवन धिवर (रा. राजगुरुनगर, शिर्डी) असे दोघे राहाता येथील मजूरीचे काम संपवून सायकलवरुन घरी जात असताना एका ठिकाणी बसले होते.

यावेळी दोन मोटार सायकलवरुन चार अनोळखी मुले त्यांचेजवळ आले. मोटारसायकली रस्त्याचे कडेला उभ्या करुन फिया व राजेद्र धिवर यांचेकडे येवून माचीस मागीतली. त्यावेळी राजेद्र धिवर याने त्याचे जवळील पिशवीमधून माचीस काढून सायकलचे सिटवर ठेवून सदर अनोळखी मुलांना घेण्यास सांगितले.

त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी त्यांच हातातील कोणत्यातरी धारदार हत्याराने राजेद्र आंतवन धिवर याचे डोक्यावर, पोटावर वार केला व पळून गेले.

याप्रकरणी संजय मधूकर पवार ( सेन्ट्रींग मजुरी, रा. राजगुरुनगर, शिर्डी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून घटनेबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर लाईव्ह 24