अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जिल्ह्यातील बेलापूर येथील बहुचर्चित व्यापाऱ्याचे हत्याकांडाने नगर जिल्हा हादरून गेला होता. याच हत्याकांडातील अटकेत असलेल्या पाच आरोपींना तीन दिवस (22 मार्च) पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बेलापूर येथील व्यापारी हिरण यांचे 1 माच रोजी अपहरण करण्यात आले होते. 7 दिवसानंतर वाकडी शिवारात त्यांचा कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर जवळून 5 आरोपींना अटक केली. यात हिरण यांच्याकडे कामाला असलेल्या नोकराच्या मुलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी याचा तपास केला. आरोपींनी ज्या गाडीत हिरण यांचे अपहरण केले. ती गाडी पोलिसांना सापडली असून या गाडीत आरोपीनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे इंधन भरल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने काल (शुक्रवारी) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींंनी गाडीत इंधन कोणाच्या कार्डवरुन टाकले याची माहिती मिळण्यासाठी
तसेच मोबाईलचे कॉल व त्याची माहिती मिळविण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी येथील न्यायालयात केली. दरम्यान आरोपीना 22 पर्यंत पोलीस कोठडी दिली.