अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरातून एक दहा टायर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक एम एच १७ बी वाय 55 59 चोरी गेल्याची तक्रार १५ ऑगस्ट २०२१ रोजी रेहान शहा याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा,नगर यांच्याकडून चालू होता.या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला फिर्यादी रेहान आयुब शहा , वय वर्षे 29 ,राहणार -बाबरपुरा,पाण्याच्या टाकी जवळ,वाड नंबर 2,श्रीरामपूर हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेने फिर्यादीकडे कसून केलेल्या तपासामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रेहान आयुब शहा यांच्यासह त्याचे साथीदार इस्माईल शेख,राहणार -वार्ड नंबर 2 ,श्रीरामपूर व पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे,राहणार- वार्ड नंबर 2 ,श्रीरामपूर यांना या गुन्ह्यांमध्ये आरोपी केले आहे.

यातील पहिल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई चालू आहे. विमा कंपनीकडून विम्याची रक्कम उकळण्यासाठी आरोपींने हे गुन्हेगारी कृत्य केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.दिवटे ,सपोनि.इंगळे, सहाय्यक फौजदार नाणेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे,पोलीस नाईक शंकर चौधरी,रवी सोनटक्के,पोलीस शिपाई रवींद्र घुंगासे ,सागर ससाने ,रोहित येमुल व चालक हवालदार गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24