अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी २४ तासात जेरबंद केला आहे.
आरोपी शाबाज सलीम शहा (वय -२२ रा. काझीबाबारोड वार्ड क्र.२ श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार ह्या घरफोड्या संशयित आरोपी शहा याने केल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी शहा याचा शोध घेवून त्याच्याकाडून तीन मोबाईलसह एक मंगलसूत्र असा ७५ हजारांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला.
ही कारवाई श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सानप यांच्या पथकाने केली.