उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपी जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू बबन शेवाळे, (वय- ४१ वर्षे, श्रीरामपूर) हे कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे उघडे दरवाजावाटे आतमध्ये प्रवेश करुन घरातील मोबाईल , रोख रक्कम असा एकूण १७,५०० रुपयांचा ऐवज चोरी करुन नेला होता.

याबाबत फिर्यादी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा गुन्हा जफर शेख, (रा. हुसेननगर, श्रीरामपूर) याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस पथकाने श्रीरामपूर येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे जफर रज्जाक शेख, (रा.हुसेननगर, श्रीरामपूर) यांस ताब्यात घेतले.

त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हया केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे . पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24