अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक केली आहे. दरम्यान ही घटना कोपरगाव शहरात घडली होती.

पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील बारा वर्षीय मुलीस १५ फेब्रुवारी सोमवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास लघुशंकेस जाऊन येथे असे सांगत गायब झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पालकांनी संशयित आरोपी राजू पोपट पगारे (रा. तळवाडे ता. येवला जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आरोपीस अटक करण्यात आली असून मुलीस पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीस कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24