पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, ही राहुरी तालुक्यातील अतिशय धक्कादायक घटना आहे.

याबाबत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

त्यात म्हटले, की जिथे पत्रकार सुरक्षित नाही, तिथे सामान्य जनतेच काय होईल? असा प्रश्न सर्वसमान्यांना पडलेला आहे.

ही घटना घडून सहा दिवस उलटून गेले, तरी अद्याप मुख्य सूत्रधार व त्याचा साथीदार फरार आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध घेऊन लवकरात लवकर त्यांना अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा ववी,

यासाठी प्रयत्न करावे, व राहुरी तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर नितीन कल्हापुरे, उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, शहराध्यक्ष प्रतिक विधाते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने, शहर संघटक राजाभाऊ आधानगले, विद्यार्थी सेना उपतालुकाध्यक्ष प्रणव गाडे, राहुल पिले, सागर नालकर, अनिल गिते आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24