अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-पारनेर शहरातील भाजी बाजारात कारवाई करीत असणाऱ्या पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व शिवीगाळ करण्यात आली.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायायासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली . याबाबत पोलीस कर्मचारी सत्यजित शिंदे यांनी फिर्याद दिली असून
या फिर्यादीवरून सुभाष भगवंत कुलट (वय ६०), सचिन सुभाष कुलट (वय ३१), बाबाजी रामदास खोडदे (वय ४०) रा. सर्व जामगाव रस्ता पारनेर यानाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व पारनेर पोलीस पथक शहरात गस्त घालत होते.
लाल चौकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत भाजी बाजार भरला होता. यावेळी भाजी विक्रेत्यांना ध्वनीक्षेपावर सूचना देण्यात आल्या. एका ठिकाणी बसून भाजी, फळे विकता येणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी थांबून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले.
यावेळी इतर भाजीपाला विक्रेते निघून गेले. मात्र सुभाष कुलट व सचिन कुलट यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. भाजी विकल्याशिवाय आपण येथून जाणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली. याच दरम्यान सुभाष कुलट यांनी बळप यांस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
इतर विक्रेत्यांना हटविणारे पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे धावले. यावेळी त्यानी पोलीस कर्मचारी यांना धक्काबुकी केली.
या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवत असताना आरोपी प्रतिकार करीत असताना दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या तीनही आरोपींना पारनेर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.