अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील नासीर सलीम शेख , (रा. आठवाडी, एकलहरे ता. श्रीरामपुर) यांचे घरी एकाने फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान याप्रकरणी नासीर सलीम शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार सदर गुन्हयातील आरोपी नामे सद्दाम ऊर्फ बबलु राजु शेख, (रा. रामगड ता . श्रीरामपुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तेव्हापासून सदर आरोपी हा फरार होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध सुरु असतांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन सद्दाम ऊर्फ बबलु राजु शेख , रा . रामगड ता . श्रीरामपुर यांस ताब्यात घेण्यात आले.