Sunil Tatkare : “आव्हाड यांच्यावर कारवाई करणं ही सूडाची भावना, मनमानी कारभार थांबवावा”; सुनील तटकरेंचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आणि कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मनमानी कारभार थांबवावा असा थेट इशारा सरकारला दिला आहे.

राज्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची रात्रीची भेट, राष्ट्रवादीच्या आमदारावर ७२ तासात २ गुन्हे आणि शिंदे-ठाकरे गटातील मारहाण त्यामुळे राजकारण खालच्या पातळीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

सुनील तटकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला ईक्षर दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. शिंदे फडणवीस सरकारने हे लक्षात घेत मनमानी कारभार थांबवावा असा इशारा दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आपले विचार मांडण्याचा सर्वांनाच आहे. ज्या तत्परतेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना याबाबतीत पोलिसांनी कारवाई अत्यंत अयोग्य होत आहे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टिकेवरही सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, यापेक्षा उलट उत्कृष्ट संसदपटू खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत हीन शब्दात, राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहेत.

आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत काहीच मत प्रदर्शित केलं नाही. खरं तर कारवाई व्हायचीच असेल तर याहीपेक्षा कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर व्हायला पाहिजे, अशी भूमिका सुनिल तटकरे यांनी मांडली.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करणं ही सूडाची भावना आहे. प्रत्यक्षात या पद्धतीचं कृत्य करणारे मंत्री राज्याच्या सरकारमध्ये आहेत. ही कारवाई ताबडतोब झाली पाहिजे. राज्यातला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर आहे.

आपल्या भूमिकेशी सहमत होणाऱ्या लोकांवर सतत कारवाई करणे, संभ्रमाचं भयावह पद्धतीचं वातावरण निर्माण करणारं हे लोकशाहीला पूरक नाही, असे तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.