अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान राज्यासह देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे.
यामुळे सर्वत्र प्रशासन सतर्क झाले आहे. नुकतेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महसूल व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तालुकावाईज महसूल व पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले असताना आज दिनांक १९ फेब्रुवारी पासून राहुरीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
कोरोना संसर्ग वाढवू नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करावा असे आवाहन महसूल व पोलीस प्रशासनाने केले आहे.