अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील संतोष ढेमरे तसेच वाहन विभागाचे अण्णासाहेब जाधव यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश साईबाबा संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काढले आहे.
दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे सध्या रजेवर असून त्याजागी प्रभारी म्हणून उप कार्यकारी अधिकारी यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कारवाईची कारणे जनसंपर्क विभागातील संतोष ढेमरे यांच्या ड्युटीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साईदरबारी दर्शनासाठी आले असता त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी दर्शनपास न घेता मंदिरात प्रवेश मिळवला होता.
याचा भुर्दंड साईसंस्थानने त्यांच्या खिशातून वसूल करत चक्क 9 हजार रुपये भरून घेतले. तसे पाहिले तर यामध्ये पासेस तपासणी करून मंदिरात सोडण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर आहे का? अन्य कोणावर,
त्यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या चुकीचे खापर ढेमरे यांच्या डोक्यावर फोडले का? अशीही चर्चा कर्मचार्यांमध्ये आहे. संस्थान प्रशासनाची कडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.