अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असताना. या काळात विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंन्स न पाळणारे यांच्यावर श्रीगोंदा पोलिसांनी कडक कारवाई करत, मागील ३ महिन्यात सुमारे ७ लाख ९ ४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र असे असताना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरत आहेत.
विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक, वाहनांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती, मास्क न वापरणारे,
सोशल डिस्टन्स न पाळणारे यांच्यावर श्रीगोंदा पोलीसांनी १९ फेब्रुवारी ते ८ मे या कालावधीत दंडात्मक कारवाई करत सुमारे २ हजार ६३५ केसेस करून ७ लाख ९४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
अहमदनगर दौंड महामार्गावर काष्टी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावून वाहने चेक करून विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहन चालक यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ढिकले यांनी दिली.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.