कर्तव्यात कसूर केल्याने या पोलीस निरीक्षक निलंबनाची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक रोहिदास अशोक माळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यानी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येत असल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ते वेळोवेळी रजेवर गेले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख हे नाराज होते.

त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना माहिती दिली होती. मदने यांनी उपनिरीक्षक माळी यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता.

या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिनांक 15 जुलै रोजी आदेश काढून उपनिरीक्षक माळी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. हि आहेत कारवाईची कारणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामकाज न करता स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे,

ड्युटीवर वेळेत न येणे, कोरोना उपचाराबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती न देणे, करोना काळात रजेवर असतानाही पोलीस स्टेशन गुन्हे प्रकरणाचे कामकाज केल्याच्या नोंदी घेऊन बेकायदेशीर काम करणे असा ठपका पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान माळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यानी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ सुरु आहेत तर शहरात उलटसुलट चर्चा आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24