अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीररित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कर्जत तालुक्यातील धालवडी येथे भरारी पथकाने कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा गौण खनिज भरारी पथकाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक कार्यान्वित आहे.
या पथकाला धालवडी- कुळधरण रस्त्यावर बेकायदेशीररित्या मुरमाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रेलर आढळून आला. त्यावर पथकाकडून कारवाई करण्यात आली.
हा ट्रॅक्टर जप्त करून तलाठी ढगे यांच्या ताब्यात दिला आहे. पुढील दंडात्मक कारवाईसाठी ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा गौणखनिज भरारी पथकातील शिरस्तेदार यांनी ही माहिती दिली.