विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई,नागरिकांनी गर्दी करू नये…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे काल सकाळी दहा वाजता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गैरवर्तन व विना माक्स फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल केला.

यावेळी माजी सरपंच केशवराव होन व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्रात कालपासून संचारबंदी लागू झाली आहे.

पाच पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करू नये. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये,अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत असतानाही काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने हा कारवाईचा बडगा उचलावा लागत असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

किराणा दुकान व दवाखान्यामध्येही तालुका पोलिस स्टेशन व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राऊंड मारत सूचना केल्या.

माजी सरपंच केशवराव होन यांनी सांगितले की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत चांदेकसारे वेळोवेळी नागरिकांची काळजी घेण्यासाठी आपल्या पातळीवर विविध उपाय योजना राबवत आहेत.मात्र त्यासाठी ग्रामस्थांची साथ महत्त्वाची आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24