अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-दुधामध्ये पावर ऑइल टाकून भेसळ करणाऱ्या राहूरी तालुक्यातील चंडकापूर शिवारातील दूध डेअरी चालकाविरुद्ध राहूरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
राहुरी तालुक्यातील चंडकापूर ,पोस्ट- केंदळ येथील डेअरी चालक राजेंद्र चांगदेव जरे( वय 31 वर्षे) याने गाईच्या दुधात “ लाईट लिक्विड पॅराफीन हे पावर ॲाईल व व्हे पावडर “ असे भेसळ पदार्थ मिसळून मनुष्यास खाण्यास असुरक्षित आणि मनुष्याच्या जीवितास धोकेदायक असे दूध तयार करून
त्याची विक्री केली आणि मानवी जीवितास हानी पोचवली म्हणून प्रदीप कुटे,अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग,नगर
यांनी राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 340 /2021 भादंवि कलम 328 ,273 व अन्नसुरक्षा मानके कायदा चे कलम 26 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुध भेसळीचा हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा आणि समाजाच्या आरोग्यासाठी घातक असल्याने या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दुधाळ हे स्वतः कटाक्षाने करीत आहेत.