अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे मावा विक्री करणाऱ्या चार जणांविरुध्द नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पो.ना. संतोष शंकर लोढे यांच्या फिर्यादीवरुन चार जणाविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेस शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सर्रास मावा विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील सहा जणांच्या पथकाने काल दुपारी छापा टाकला. त्यामध्ये राजेंद्र पंढरीनाथ शिंदे , लतिफा बाबा शेख , रम्मु बाबा शेख,
जमीर रशीद शेख हे चार जण राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखू व मावा शरिरीरास अपायकारक असल्याचे माहित असतांनाही ते तयार करुन त्याची विक्री करतांना आढळून आले.
त्यामुळे त्यांच्या विरुध्द कारवाई करुन १६ हजार ९०० रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, सुपारीपासून तयार केलेला मावा, सुपारी चुरा असे साहीत्य जप्त केले आहे.पोलिसांच्या या धडक कारवाईने या भागातील अनेकानी धसका घेतला आहे.