अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाची परिस्थिती सुधारतात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून लॉकडाऊन शिथिल केलेले आहे. त्याचे सुद्धा संगमनेर मधील छोटे दुकानदार, व्यापारी, हातगाडीवाले, भाजीपाला, फळे, हॉटेल, सलुन, स्टेशनरी व इतर लहान मोठ्या आस्थापनावले नियमांचे पालन करत आहेत.
असे असतांना अचानक व्यापारी संघटनेचे काही पदाधिकारी व प्रशासन यांच्यातील बैठकीनुसार दुकाने सकाळी 7 ते 5 सुरु ठेवण्याबाबत आवाहन करुन जनतेमध्ये संभ्रम केला गेला त्याचा संगमनेरातील छोटे व्यवसायीक, संघर्ष टपरीधारक संघटनेने निषेध केला आहे.
कुठलाही शासकीय आदेश नसतांना बळजबरीने पोलीस, पालिका प्रशासनाकडून शहरातील दुकाने सायंकाळी 5 नंतर बंद केली जात आहे. या कार्यवाही विरोधात आम्ही संगमनेरकर व संघर्ष टपरीधारक संघटनेने आज सकाळी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेत असा कोणाताही शासकीय आदेश नाही तसेच या वेळेत आपले व्यवसाय सुरु ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय व्यावसायिकांना ऐच्छिक असेल, सकाळी 7 ते 5 या वेळेचे कोणतेही बंधन नाही असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले.
करोना रुग्ण प्रमाण थांबले पाहिजे हे सर्वांना मान्य आहे पण आज जी आर्थिक मानसिक घडी छोट्या मोठ्या दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच दुकान भाडे, लाईट बिल, स्थानिक कर, कामगार पगार यामुळे सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत.
त्याबाबत सुद्धा असे आवाहन करतांना प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. दरम्यान कुठलाही आदेश नाही तर पालिकेकडून बाजारपेठेत व इतर ठिकाणी भोंगा लावून दुकाने 5 वाजता बंद करा, असे सांगितले का जात आहे?
करोनाच्या नावाखाली सुरु असलेली प्रशासनाची मनमानी तसेच पोलीस पथक 5 वाजता दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास सांगत आहेत हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी संगमनेरकरांनी निवेदनाद्वारे केली आहे.