अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले टोळीतील पाच जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये राहूल निर्वाश्या भोसले (वय 22 वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता नगर), उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 वर्षे, रा. बुरुडगाव, ता.नगर ), दगू बडूद भोसले, (वय 27 वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव,), निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले (रा. सारोळा कासार, ता. नगर )
आणि पप्या मोतीलाल काळे (रा. पैठण, ता. पैठण) अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नगर तालुक्यात 15 एप्रिल रोजी दरोड्याचा गुन्हा घडला होता. हा दरोडा राहुल भोसले यांच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
त्याच्यासह टोळीतील ऊरूस चव्हाण व दगू भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. अन्य दोघे पसार आहेत. जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत.
त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते.