अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान तांदळे टोळी विषयी सुपा पोलीस ठाण्यात अक्षय चखाले (रा. निगडी , पुणे) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हा नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल भाऊराव साळवे,
शाहुल अशोक पवार व अमोल छगन पोटे यांना मा.विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता मा. विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.