‘त्या’ प्रस्तावानंतरच आरोग्य अधिकारी बोरगे यांच्यावर कारवाई केली जाणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांनी दालनात वाढदिवस साजरा केला होता.

याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती.

बोरगे यांना २४ तासात खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र बोरगे यांनी मुदतीत खुलासा सादर केला नाही.

तसेच प्रत्यक्षात गुरुवारी सायंकाळी बोरगे खुलासा घेऊन आयुक्तांकडे आले होते. परंतु, आयुक्त गोरे यांनी त्यांचा खुलासा स्वीकारला नाही.

तसेच बोरगे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश त्यांनी सामान्य प्रशासनाला दिला. सामान्य प्रशासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बोरगे यांच्यावर कारवाई केली जाईल,

असे गोरे यांनी सांगितले. याशिवाय रेमडेसिविर प्रकरणी चौकशीसाठी पोलिसात हजर होण्याचा आदेश बोरगे यांना देण्यात आला होता.

मात्र बोरगे चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नव्हते. गुरुवारी चौकशीसाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हजर होत बोरगे यांनी खुलासा सादर केला.

तसे पत्र बोरगे यांनी आयुक्तांना सादर केले असून, त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात, यावरच पुढील चौकशी अवलंबून असणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24