जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्यांवर होणार कारवाईची संक्रांत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसताच अनलॉक करण्यात आले आहे. यामध्ये शासगीसह शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थित सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र कोरोनाचा धोका कायम असतानाही नागरिकांकडून शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केले जात असल्याचे दिसून आले आहे. यातच आता अशा गर्दी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेतील कामकाज शंभर टक्के सुरू झाल्यापासून गर्दी वाढलेली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली असून,

त्यांनी याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा करून कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने जिल्हा परिषदेत येऊन कारवाईची मोहीम राबविली. जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात विकासकामे केली जात आहेत.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने विनामास्क फिरणाऱ्यांवर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी अधिनियम दुरुस्ती करून उपविधी तयार केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे;

परंतु जिल्हा परिषदेची इमारत महापालिका हद्दीत असल्यामुळे त्यांना अशी कारवाई करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व कारवाई करण्यासाठी

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार मिळावा, यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर महापालिकेच्या पथकाने जिल्हा परिषदेत जाऊन कारवाई मोहीम राबविली.

दरम्यान जिल्हा अनलॉक जरी करण्यात आला असला तरी कोरोना अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर पणे वागणे टाळावे कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24