वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर हल्ला केल्यास होणार कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर जिल्हयामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. यातच काही रुग्ण बरे होऊन घरी जातात तर काहींचा मृत्य होतो.

यावेळी संतप्त नातेवाईकांकडून डॉक्टर, कर्मचारी, नर्स, वॉर्ड बॉय यांच्यावर हल्ला केला जात असल्याचा प्रकार घडला आहे. मात्र आता या वैद्यकीय सेवकांच्या सेवेसाठी खुद्द पोलीस विभाग मैदानात उतरले आहे.

वैदयकिय क्षेत्रातसेवा देणाऱ्या लोकांना झालेल्या हल्लाची व रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध करतो यापुढे वैदयकिय सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्यास व रुग्णालयाची तोडफोड झाल्यास हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

याकरता पोलिस विभागाने हेल्पलाइन नंबर सुद्धा दिला असल्याचे असे नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये म्हणलेले आहे.

वैद्यकीय सेवकांवर हल्ला करणाऱ्या अशा हल्लेखोर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दल सक्षम असुन सर्वते कायदेशीर पुरावे जमा करुन अशा हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्नशिल असतील.

अहमदनगर लाईव्ह 24