ताज्या बातम्या

Twitter New Rules : ‘या’ वापरकर्त्यांवर होणार कारवाई, आजपासून होणार बदल!

Published by
Ahmednagarlive24 Office

Twitter New Rules : जगभरात ट्विटर वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत शानदार फीचर्स घेऊन येत असते. ज्याचा वापरकर्ते पूर्णपणे लाभ घेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा ताबा एलन मस्क यांनी घेतला आहे.

तेव्हापासून ट्विटरमध्ये अनेक बदल होत असतात. असाच एक बदल आता त्यांनी केला आहे. आजपासून एखाद्या वापरकर्त्याने आक्षेपार्ह पोस्ट किंवा कमेंट केली तर त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. परिणामी त्याचे खाते निलंबितही केले जाईल.

ट्विटरवर असे अनेक यूजर्स आहेत जे वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करतात, तसेच वाईटही लिहितात हे तुम्हाला माहीतच असेल. परंतु,आता ट्विटरने हे थांबवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच आजपासून या प्लॅटफॉर्मवर एक नवीन नियम लागू होत आहे. या अंतर्गत, चुकीचे शब्द वापरणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या अकाऊंटवर मोठी कारवाई केली जाणार आहे.

खाते निलंबित होणार

आजपासून अशोभनीय भाषा वापरणाऱ्या युजर्सची खाती निलंबित केली जाणार आहेत. परंतु, त्या अगोदर ट्विटर नक्कीच आढावा घेईल.

तेव्हाच चालू होईल खाते

ज्या वापरकर्त्यांना निलंबित केलेले किंवा पुनरावलोकन केलेले खाते चालू करायचे असेल तर त्यांना त्यासाठी ट्विटर विनंती करावी लागेल. तरच वापरकर्त्यांचे खाते चालू होऊ शकते.

ट्विटरवर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात असभ्य भाषेत कमेंट किंवा पोस्ट केल्या जातात काही वापरकर्त्यांना ट्रोल केले जाते. परंतु, आता कंपनीच्या नवीन नियमामुळे यावर बंदी येऊ शकते.

Ahmednagarlive24 Office