अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे.
नुकतेच जामखेड शहरातील बाजारतळ येथुन चोरी गेलेली मोटारसायकल तातडीने पोलिसांनी सुत्रे फिरविल्याने एका तासात सापडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरातील एक व्यापारी सुनील चोरडीया हे होंडा कंपनीची अॅक्टीवा स्कुटी गाडी उभी करून बाजार करण्यासाठी गेले असता बाजार घेतल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
काही वेळ शोधाशोध करून काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला गाडी चोरी गेली असल्याचा अर्ज दिला.
यावरून जामखेड पोलीस पथकाने तात्काळ सुत्रे हालवत शहरातील विविध भागात शोध घेतला असता कुंभरतळे या ठिकाणी सदर गाडी रस्त्यावर उभी असल्याचे आढळून आले.