अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसानिमित फ्लेक्स बोर्ड व हार गुच्छ यावर होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याच्या केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला.
आ. आशुतोष काळे यांचा ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी कार्यकर्त्यांकडून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मात्र मागील वर्षापासून आलेले कोरोना संकट अजूनही संपण्याचे नाव घेत नाही व मागील महिन्यात राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आदि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा हजारो कुटुंबाना फटका बसला असून शेती, व्यापार, उद्योग व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अ
शा परिस्थितीत आ. आशुतोष यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसाला कार्यकर्त्यांचा उत्साहापोटी फ्लेक्स, हार, गुच्छ आदि गोष्टींवर होणारा खर्च टाळून या खर्चातून पूरग्रस्तांना मदत व्हावी हा त्यामागे उद्देश होता.
आसमानी संकटाचा त्या जिल्ह्यातील नागरिकांनी धीरोदत्तपणे मुकाबला केला असला तरी आता त्यांना मदतीची गरज आहे. शासन त्यांच्या परीने सर्वोतोपरी मदत देखिल करणार आहे.
मात्र सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाची पूरग्रस्त बांधवांना मदत होण्यासाठी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आर्थिक स्वरूपातील मदतीचा धनादेश तहसीलदार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला.
यावेळी फकीरमामू कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, मौलाना मुख्तार, मौलाना हाजी बशीर, हाजी मोसिम आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.