file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईच्या निधनाची बातमी खुद्द अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अक्षयच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच अक्षय कुमारनं सर्व कामं, चित्रीकरण अर्ध्यावर सोडत तडक मायदेश गाठला. अक्षयने आईसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे.

माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईसाठी चाहत्यांना दुवा करा, असं म्हटलं होतं.

माझ्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं अक्षय कुमारने आईच्या आजारपणादरम्यान म्हटलं होतं.

अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमिटमेंट देखील चालू आहे.

वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो. नुकतीच चित्रपटगृहे उघडल्यानंतर अक्षय कुमारने आपला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.