अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपतीराज कुंद्रा यांना अटक अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. सोमवारी दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली.
एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आला होता. एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती.
चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती.
हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होते. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.
चद्योगपती सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. 15 दिवसांपूर्वी जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
“मला लालच देऊन माझी फसवणूक केली आहे. 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या एसजीपीएलची सतयुग गोल्ड स्कीमद्वारे फसवणूक केली आहे”, असा आरोप मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी केला होता. “सतयुग गोल्ड स्कीमद्वारे विकलेली पाच वर्षाच्या स्वर्ण योजनेद्वारे डिस्काऊंट देत खरेदीदारांना सतयुग गोल्ड कार्ड दिले.
पाच वर्षानंतर एक निश्चित प्रमाणात किंमत देणार असल्याचेही सांगितले होते”, अशी माहिती तक्रारदार जोशी यांनी दिली होती. दरम्यान, यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.