अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-नवोदित महिला कलाकारांना वेबसिरीज किंवा मालिकेत काम मिळवून देतो, असे सांगून बोलावलं जायचं आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट केले जायचे.
नंतर ते विविध ॲप आणि अश्लील चित्रपटात वापरले जायचे. बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीचे हे उद्योग तपासात उघड झाले आहेत.
राजच्या बहिणीचा नवरा चालवतो हाॅटशीट :- राज कुंद्रा यांची व्हिआन नावाची कंपनी आहे. तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप झालेलं होतं. ती लंडनची कंपनी आहे. ही कंपनी राज कुंद्रा यांचा नातेवाइक बहिणीचा नवरा लंडनमधून चालवतो.
त्यांचं अॅप होतं हॉटशॉट. हे सर्व लंडनमधून सुरू होतं; मात्र कंटेट आणि अॅपचं ऑपरेशन, अकाऊंटिंग राज कुंद्रांच्या व्हिआन कंपनीमार्फत व्हायचं.
न्यायालयाची परवानगी घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यामध्ये सर्व महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतरच राज कुंद्रा आणि त्यांच्या सहका-यांना अटक करण्यात आली.
पाय अधिक खोलात :– राज कुंद्रा यांचे पाय अधिक खोलात गेले आहेत. राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वेब सीरिज किंवा फिल्म्समध्ये संधी देतो असं आमिष दाखवलं जायचं. ऑडिशन्स घेतलं जायचं, त्यावेळी सेमी न्यूड आणि न्यूड सीन्स घेतले जात.
छोट्या क्लिप्स तयार करून काही वेबसाईट्स आणि काही मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या.असे व्हिडिओ बनवून काही वेबसाईट्स आणि ओटीटी प्लेटफॉर्मसाठी विकले जात होते.
या वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशनच सबस्क्रिप्शन घेऊन मेम्बरशीप दिली जात होती. उमेश कामत नावाचा व्यक्ती या प्रकरणात इंडिया हेड होता. तो राज कुंद्रा यांच्या कंपनीत काम करत होता.
सर्व महत्त्वाचे धागेदोरे हाती :- हॉटशॉट या अॅपवर पोर्नोग्राफी असल्याने, अॅपल स्टोअर आणि गुगल स्टोअरने डाऊन केलं आहे. त्यामुळे ते अॅप नाहीत. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून हे काम करतं.
कालपर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यात रोहा खान आणि तिचा पत्नी, गहना वशिष्ठ, तन्वीर हाश्मी, उमेश कामत यांचा समावेश आहे.
पॉर्न रॅकेट प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल :- काही तांत्रिक पुरावे व्हेरिफाय करायचे होते, त्याअनुषंगाने तपास सुरू होता. ते मिळाल्यानंतर आम्ही राज कुंद्रा यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर ही कारवाई केली.
आम्हाला सबस्क्रिप्शन्स, अॅग्रिमेंटचे पेपर आणि काही अश्लील व्हिडिओ शिवाय अजून काही तांत्रिक पुरावे हाती लागले आहेत. पॉर्न रॅकेट प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत.
त्यात महाराष्ट्र राज्य सायबर सेलमध्ये 1, मालवणी पोलिस ठाण्यात 2, गुन्हे शाखेत एक आणि लोणावळा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.