अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- एखादा व्यक्ती पॉझिटिव झाला आहे, एवढं जरी ऐकलं तरीसुद्धा माणसाला धडकी भरते, हृदयाचे ठोके हे वाढू लागतात, संशयाचे भूत मनात वेगवेगळे घर करू लागते आणि त्याचवेळी त्याचं बरं-वाईट सुद्धा होऊ शकतं.
अशाही अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. अशावेळी कोरोना बाधीत रुग्णांनी धीर धरून मनाणे खचून न जाता रोगाला सामोरे जाऊन लढा देणे एवढं महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रताप ढाकणे यांनी केले.
ॲड. ढाकणे व त्यांच्या सुविद्य पत्नी जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे यांनी कोरोनाशी पंधरा दिवस लढा देऊन आज त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली.
माजी कॅबिनेट मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पत्नी स्वर्गीय सुमनताई ढाकणे यांच्या पुण्यतिथी निमित्त केदारेश्वर कोविड सेंटरवर ह.भ.प. कुऱ्हे महाराज कांबीकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते यावेळी ढाकणे हे पत्रकारांशी बोलत होते.