अदर पूनावाला म्हणतात, कोविशील्ड लस घेतल्यानंतर रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सीरमच्या कोरोना लसीचे नाव कोव्हिशील्ड आहे. या लसीमुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखले जावू शकणार नाही, ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल.

त्याचबरोबर ९५ टक्के केसेसमध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, असे सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? याचे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ही लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे.

गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडे फार डॅमेज होते. जानेवारीपासून आतापर्यंत ४ कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे. हे लोक रुग्णालयात भरती आहेत का हे पाहावे लागणार असल्याचे आहे.

यूरोपातून एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सिनवर प्रश्न केले गेले आहेत. त्यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. या व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच तिचे परिणाम आणि न्यूरॉलॉजिकल परिणामांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आता ब्लड क्लॉटिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु, नियामक आणि व्हॅक्सिनची तपासणी करणाऱ्यांना त्याची तपासणी करू द्यावी, त्यानंतर कोणत्या तरी तर्कावर आले पाहिजे. त्यासाठी थोडी कळ सोसली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या व्हॅक्सिनमुळे आजारच होणार नाही, असे मी कधीच सांगितलेले नाही. लोकांमध्ये कदाचित अशा प्रकारचा समज झाला असावा, त्याबाबत सांगता येत नाही. आज बाजारात अनेक व्हॅक्सिन आहेत. त्या तुमचा संसर्ग होण्यापासून बचाव करत असतील.

परंतु ही व्हॅक्सिन तुमची सुरक्षा करते. जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हॅक्सिनचे कौतुक केले आहे. त्यामुळेच सर्वांना लसीकरण करून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. आज अनेक औषधे आहेत जे कधी काळी त्या त्या आजारावर उपयुक्त होते.

परंतु आज ती औषधे निकामी ठरत आहेत. मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही. अनेकदा अनेक गोष्टी काम करतात तर काही वेळा कामच करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24